श्री. एम. जे . प्रदिप चंद्रन (भाप्रसे) संचालक

महाराष्ट्र राज्य खानिकर्म महामंडळ

महाराष्ट्र राज्य खानिकर्म महामंडळ मर्यादित महाराष्ट्र राज्य खानिकर्म महामंडळ मर्यादित (एमएसएमसी) ही कंपनी कायदा, 1956 अंतर्गत 14 नोव्हेंबर, 1973 रोजी अंतर्भूत केलेली, पूर्णपणे महाराष्ट्र सरकारच्या मालकीची मर्यादित कंपनी आहे.

उद्दिष्टे

राष्ट्राच्या खनिज संपत्तीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने विविध खाणींच्या पद्धतशीर विकासाला चालना देणे. महाराष्ट्र राज्यात किंवा इतरत्र, असलेल्या खाणी, खाण हक्क आणि धातूयुक्त जमीन खरेदी करणे किंवा भाडेतत्त्वावर घेणे, आणि त्याचा उपयोग नफा प्राप्त करण्याच्या दृष्टीने त्याठिकाणी संशोधन करणे, काम करणे, विकास करणे या कामांचा समावेश आहे. कंपनीच्या सुयोग्य संचालनासाठी लागणाऱ्या बाबींची पूर्तता करणे जसे खाणीच्या ठिकाणी चुरा करण्याची कामे, उत्खनन, कॅल्सीन, गळणे आणि शुद्धीकरणाची कामे, ड्रेस करणे, एकत्र करणे, फेरफार करणे आणि उत्पादनाला वापरासाठी बाजारपेठ तयार करणे याशिवाय धातूंची ओळख आणि नफा आणि सर्व प्रकारच्या प्रमुख आणि गौण खनिजांचे अपग्रेडेशन (स्तर वाढविणे) इत्यादींचा समावेश आहे.

श्री. आशीष जयस्वाल अध्यक्ष